निर्यात कोटा कमी मिळाल्याचा साखर विक्रीवर परिणाम

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील सर्व साखर कारखान्यांकडे मिळून सध्या १० लाख ९५ हजार टन साखर शिल्लक आहे. दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी कोल्हापूर विभागात याच दिवसात साधारणपणे ७ लाख टन साखर साठा शिल्लक होता. यंदा कारखान्यांना निर्यात कोटा कमी मिळाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत तीन लाख टनापेक्षा जास्त साखर कारखान्यांच्या गोडाऊनमध्ये शिल्लक आहे. साखर विक्री घटल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शिल्लक साखरेचे करायचे काय? असा प्रश्न साखर कारखानदारांना पडला आहे.

साखर कारखान्यांनी आगामी गाळप हंगामाची तयारी सुरु केली आहे. आता कारखान्याकडून नवी साखर येण्यापूर्वी जुन्या साखरेची विक्री करून गोडाऊन रिकामी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात कोल्हापूर विभागातील ३६ साखर कारखान्यांमधून एकूण १७ लाख ३८ हजार टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांकडे ७ लाख टन तर सांगली जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांकडे ३ लाख ९५ हजार टन साखर शिल्लक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here