फिजी मध्ये उसाच्या गुणवत्तेमुळे साखर उत्पादनावर परिणाम

फिजी शुगर कॉर्पोरेशन (FSC) ने सांगितले की त्यांच्या तीन साखर कारखान्यांमध्ये ऊसाच्या कमी गुणवत्तेमुळे साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे. आपल्या नव्या उद्योग अपडेट मध्ये, FSC यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून ऊस गाळपासाठी अधिक जाळलेले ऊस पाठवले जात आहेत, ज्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.

कारखानदारांनी सांगितले की, रारावई कारखान्यात 98 टक्के जळालेला ऊस मिळाला. तर लुटोका कारखान्याने 9 नोव्हेंबर पर्यंत 89 टक्के जळालेल्या ऊसाचे गाळप केले.

FSC ने सांगितले की, गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत सर्व कारखान्यांनी 140,834 टन साखरेचे उत्पादन केले जे 4244 टन कमी होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here