शामली : रोलर आणि मोटरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे अप्पर दोआब साखर कारखाना गेल्या पाच दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी साखर कारखाना बंद झाल्याने कारखाना गेटपासून शामली पोलीस ठाण्यापर्यंत ऊसाच्या वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागला. अप्पर दोआब कारखाना ३१ ऑक्टोबर रोजी सुरू झाला आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर तो तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखाना रखडत रखडत गाळप करीत आहे. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता कारखान्यात पुन्हा बिघाड झाला. त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पुन्हा कारखाना बंद पडला. त्यामुळे शामली पोलीस ठाण्यापर्यंत लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या. त्याचा फटका लोकांना बसला. शामली कारखान्याचे ऊस विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक दीपक कुमार राणा यांनी सांगितले की, रोलर खराब झाल्याने कारखाना बंद पडला आहे. गेल्या पाच दिवसांत कारखान्याने एक लाख २० हजार क्विंटल उसाचे गाळप केले आहे.