नवी दिल्ली : चीनी मंडी
म्यानमार आणि भारत यांच्यात साखरेच्या बदली डाळी देण्याची वस्तू विनिमिय पद्धतीसारखा व्यवहार होण्याची शक्यता आहे. भारतात साखरेचे उत्पादन सर्वाधिक झाले आहे, तर म्यानमारमध्ये डाळींचे. त्यामुळे दोन्ही देश यावर सन्माननीय तोडगा काढण्याची शक्यता आहे.
म्यानमारमध्ये सध्या साखरेचा तुटवडा जाणवत आहे. तफावत भरून काढण्यासाठी त्यांना कमीत कमी दहा लाख टन साखरेची गरज आहे. त्याचवेळी जगातील सर्वांत साखर उत्पादक देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. दुसरीकडे उसाचे क्षेत्र वाढत असताना यंदा डाळींचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये म्यानमारमधून डाळ आयात केली जाण्याची शक्यता आहे. ही डाळ सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतून गरजूंना देण्यात येण्याची शक्यता आहे. भारतात २४ ऑगस्टपर्यंत खरीपाच्या डाळीचे क्षेत्र १३.१ दशलक्ष हेक्ट होते. गेल्य वर्षी १३.४ दशलक्ष हेक्टरवर डाळीचे उत्पादन झाले होते. दोन वर्षांपूर्वी डाळींचे दर गगनाला भिडले होते. त्यानंतर गेल्या वर्षी अतिरिक्त उत्पादनानंतर दर घसरले तरी डाळीचे पिक घेणे शेतकऱ्यांनी थांबवलेले नाही. तरी सुद्धा यावर्षी डाळीचे ८.९ दशलक्ष मेट्रिक टन उत्पादनाचे लक्ष्य साध्य होण्याची शक्यता दिसत नाही. खराब हवामानामुळे डाळीच्या उत्पादनात १० टक्क्यांची घसरण दिसत आहे.
विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर भारतानंतर म्यानमार हा असा एकमेव देश आहे. ज्या देशात उडदाची डाळ पिकवली जाते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताने निर्यात निर्बंध लादल्यानंतर म्यानमारच्या बाजारपेठेत डाळींचे भाव घसरले आहेत. डाळ उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच भारताकडून मागणी कमी झाल्याने शेतकऱ्यांना इतर पिके घ्यावीत, असे आवाहन म्यानमार सरकारने केले आहे.