कृष्णा कारखान्याचे महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत महत्त्वाचे योगदान : पटेल

सातारा : कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत महत्त्वाचे योगदान आहे. एकूणच साखर कारखानदारीसाठी कृष्णा कारखाना दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन गुजरात राज्यातील गणदेवी सहकारी खांड उद्योग मंडल कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष रणजितभाई पटेल यांनी केले. रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते.

गणदेवी येथील सहकारी खांड उद्योग मंडल कारखान्याच्या शिष्टमंडळाने कृष्णा कारखान्यास भेट दिली. कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष रणजितभाई पटेल, माजी अध्यक्ष व संचालक कांतीभाई पटेल, गणपतसिंह चव्हाण, वीरेंद्र भाई पटेल, नटूभाई पटेल यांनी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांची भेट घेऊन साखर उद्योगासंदर्भात चर्चा केली. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.

कृष्णा अल्पावधीत आधुनिकीकरणाचे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल पटेल यांनी डॉ. सुरेश भोसले यांचे अभिनंदन केले. कार्यकारी संचालक पाटील यांनी कारखाना अध्यक्ष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत असलेल्या सभासद हिताच्या योजनांची माहिती दिली. कारखान्याचे  आधुनिकीकरण, घरपोच साखर, जयवंत आदर्श कृषी योजनेअंतर्गत जीवाणू खत प्रकल्प उभारणी, एकरी १०० टन ऊस उत्पादन वाढ योजना यांची माहिती दिली. व्यवस्थापक बालाजी पबसेटवार यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here