पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय सीमती ने साखरेच्या कमतरतेपासून वाचण्यासाठी आणि साखरेच्या आयातीला सोयीस्कर बनवण्यासाठी टॅक्स खूप कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानजवळ सध्यस्थितीला 1.2 दशलक्ष टन साखर शिल्लक आहे, जी दोन महिन्यामध्ये संपण्याची शक्यता आहे. यापासून वाचण्यासाठी 3,00,000 टन साखरेच्या आयातीसाठी टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयातित साखरेवर17 टक्क्याऐवजी 1 टक्का विक्री टॅक्स असेल. टॅक्समधील कमीमुळे स्थानिक बाजारात साखरेची किंमत नियंत्रीत राहण्याची आशा आहे.हि आयातीत साखर 80 रुपये प्रति किलो मध्ये विकेल. ईसीसी बैठकीचे अध्यक्षस्थान पीएम यांचे सल्लागार अब्दुल हफीज शेख यांच्याकडे होते . उद्योग आणि उत्पादन मंत्री हम्माद अजहर म्हणाले कि , या निर्णयामुळे देशातील साखर साठा आणि देशामध्ये साखर उपलब्धतेत सुधारणा होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.