मनिला: अनुकुल हवामानामध्ये फिलीपीन्स च्या स्थानिक साखर उत्पादनामध्ये आश्चर्यजनक दोन वर्षाच्या घसरणीनंतर सुधारणा दिसून येत आहे. ज्यामुळे साखर उत्पादन 2017 पासून आतापर्यंत उच्च स्तरावर आहे.
साखर नियामक प्रशासन (एसआरए) बोर्डाचे सदस्य रौलेंड बेल्टट्रान म्हणाले, 5 जुलै पर्यंत देशातील साखर उत्पादन 2.39 मिलियन मेट्रीक टन होते, जे सरकारच्या 2.09 मिलियन मेट्रीक टनाच्या लक्ष्यापेक्षा अधिक आहे. हे उत्पादन गेल्या पीक वर्षात 2.074 मिलियन मेट्रीक टन उत्पादनापेक्षा 15 टक्के अधिक आणि 2017 पासून 2018 पीक वर्षादरम्यान 2.08 मिलियन मेट्रीक टन पेक्षा 14 टक्के अधिक आहे.
फिलीपीन्स साखर पीक वर्ष 1 सप्ेटंबरला सुरु होते आणि पुढच्या वर्षी 31 ऑगस्टला संपते. बेल्ट्रान म्हणाले, कोविड 19 महामारी चा आउटपुट वर फार काही परिणाम झाला नाही, कारण लॉकडाउन दरम्यान साखर उत्पादन सुरु होते, कारण आयएटीएफ दिशानिर्देशांमध्ये सुट दिली गेली होती. देशातील साखरेची मागणी कोविड 19 लॉकडाउन दरम्यान घटली. ते म्हणाले, आम्ही पुरेशा साखर पुरवठ्यासाठी आश्वस्त आहोत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.