साखरेवरचे संकट झेलण्यात सरकारचा हालगर्जीपणा पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांनी केला मान्य

लाहौर : साखरेच्या किंमतीतील वाढीचे संकट झेलण्यात झालेला सरकारचा हालगर्जीपणा पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांनी मान्य केला. तसेच त्यांनी साखरेचे घटते प्रमाण आणि मूल्य वृध्दीतील प्रकरणाचा तपास करुन दोषींच्या विरोधात कडक कारवाई करण्याबाबत सांगितले आहे.

पाकिस्तातानातील पंजाब प्रांतातील गवर्नर हाऊस मध्ये शनिवारी झालेल्या हेल्थ इंश्योरेंस कार्ड च्या वितरण समारंभात ते बोल होते. ते म्हणाले, सरकारकडून हालगर्जीपणा झाला आहे. काही लोकांनी स्वार्थासाठी कृत्रिम पध्दतीने किंमतीत वाढ केली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास सरकार करत आहे. या संकटासाठी जो कोणी जबाबदार असेल, त्यांना सरकार सोडणार नाही असे वचन ही त्यांनी दिले.

इमरान म्हणाले, सरकार एक अशी प्रणाली बनवत आहे, त्यामुळे त्या उत्पादनांची ओळख होऊ शकेल. त्यानंतर त्याप्रमाणे सरकार या संभावित खाद्य संकटाशी दोन हात करण्याची तयारी करेल. ज्यामध्ये संबंधित उत्पादनाची आयातही सामिल असेल.

गेल्या महिन्यातील कमी पुरवठ्यानंतर देशभरात सााखरेच्या किंमती झपाट्याने वाढत होत्या. त्यावेळी सरकारने सांगितले होते की, या संकटाशी दोन हात करण्याचा हर एक प्रयत्न सरकार करत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here