अहिल्यानगर जिल्ह्यात २८ लाख टन उसाचे गाळप पूर्ण, ९.८४ टक्के उतारा

अहिल्यानगर : जिल्ह्यातील ११ सहकारी व दोन खाजगी कारखान्यांनी २८ लाख ७ हजार ४९३ मे. टन उसाचे गाळप करून त्यापासून २१ लाख ९४ हजार २२५ साखर पोत्यांची निर्मीती केली आहे. जिल्ह्याचा दैनंदिन साखर उतारा ९.८४ टक्के आहे. २६ डिसेंबर पर्यंत साखर कारखाने केलेले टनानुसार गाळप याबाबतचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. त्यानुसार, अंबालिका ५ लाख ३२ हजार ५७५ मे.टन., कर्मवीर काळे (२ लाख ३ हजार ७३४) सहकारमहर्षी कोल्हे (१ लाख ६५ हजार ९९२), थोरात संगमनेर (२ लाख ८० हजार ९१०), नागवडे श्रीगोंदा (१ लाख ७० हजार ९३०), गणेश (५७ हजार ३५०), गंगामाई (३ लाख ३९ हजार ३१०), पदमश्री विखे पाटील (१ लाख ९८ हजार २००), अशोकनगर (१ लाख ४७ हजार ८६०), अगस्ती (१ लाख १२ हजार ६३७), ज्ञानेश्वर (३ लाख २८ हजार ३१०), मुळा (१ लाख ९८ हजार ११०), वृध्देश्वर (७१ हजार ५७५) असे गाळप झाले आहे.

ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. ऊसदरासाठी जिल्ह्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली होती. त्याबाबत सर्व कारखान्यांची एकत्रित बैठक पार पडली. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने २८०० पहिली उचल जाहिर केली आहे. अन्य कारखान्यांनी अजुन अद्यापही उसदराची गुळणी सोडलेली नाही. इथेनॉल उत्पादनामुळे साखर पोत्यांची निर्मीती कमी आहे. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी ज्या कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे, त्यांना त्याचा फायदा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here