न्यूयॉर्क : चीनी मंडी
ब्राझील प्रमाणाचे खराब हवामानाचा फटका अमेरिकेतील साखर उद्योगालाही बसत आहे. अमेरिकेतील लुसियाना प्रांतामध्ये मुसळधार पावसामुळे ऊस तोडणीमध्ये अडथळा येऊ लागला आहे. आजवरची सर्वांत आव्हानात्मक स्थिती असल्याचे मत तेथील शेतकरी व्यक्त करत आहेत.
अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीने या संदर्भात वेल्लोट फार्मच्या डॉन्नी आणि माँटी वेल्लोट या भावंडांची प्रतिक्रिया घेतली. डॉन्नी आणि माँटी याची चौथी पिढी शेती व्यवसायात असून, तीन हजार एकर क्षेत्रावर ते ऊस शेतीचा व्यवसाय करत आहेत. सध्याच्या तेथील परिस्थितीवर डॉन्नी म्हणाले, ‘पावसाने पिकाचे खूपच नुकसान केले आहे. विशेषतः या वर्षी सर्वाधिक नुकसान झाले आहे.’ आम्हाला यंदा गेल्या वर्षी पेक्षा जास्त ऊस उत्पादन मिळाले आहे. पण, शेतामध्ये आलेला ऊस तोडण्याचे सर्वांत मोठे आव्हान आमच्यापुढे आहे,असे मॉन्टी यांनी स्पष्ट केले. शेतामध्ये ट्रॅक्टर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घसरत चालले आहे. शेतातील जमिनीची अक्षरशः चिरफाड केल्यासारखी स्थिती आहे, असे डॉन्नी यांनी सांगितले.
शेतातील या स्थितीमुळे कापणी खोळंबली आहे. ट्रॅक्टर चालवण्यासाठी जादा इंधनही वाया जाऊ लागले आहे, असे मॉन्टी यांनी सांगितले. डॉन्नी म्हणाले, ‘आम्हाला रोजच्या वाट्यासाठी आलेले काम पूर्ण करावे लागत आहे. तसेच जर आपल्या शेतामध्ये गोंधळाची स्थिती असेल, तर शेजारच्या शेतकऱ्यांची किंवा साखर कारखान्यांची मदत घ्यावी लागत आहे.’
बिकट परिस्थितीतही आम्ही आमच्या परीने चांगले काम करत आहोत. आम्ही सामान्य नागरिकांनाही आवाहन करत आहोत की तुम्हाला या चिखल होणाऱ्या खराब स्थितीत थोडे धिराने घ्यावे लागणार आहे. कारण, आम्ही रस्तेही स्वच्छ ठेवण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत, असे डॉन्नी यांनी सांगितले. या प्रांतात ऊस तोडणी हंगाम तीन महिन्यांचा असतो, अशी माहितीही त्यांनी दिली.