शामली : जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२२-२३ मधील ११२७.३७ लाख रुपयांपैकी ४३५.६६ लाख रुपयांची बिले दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचे ६९१.७० लाख रुपये थकवले आहेत. या कारखान्यांनी फक्त ३८.६४ टक्के बिले दिली आहेत. त्यामुळे या कारखान्यांनी काहीही करावे, पण शेतकऱ्यांना तातडीने ऊस बिले अदा करावीत, असा निर्वाणीचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखान्यांकडून बिले वसूल करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हाधिकारी रविंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तिन्ही साखर कारखान्यांच्या ऊस बिले देण्याच्या स्थितीचा आढावा घेतला. शामली कारखान्याकडे २६४.१४ लाख रुपये थकीत असल्याचे आढळून आले. ऊन साखर कारखान्याकडे १४२.१९ लाख रुपये आणि थानाभवन कारखान्याकडे २८५.१० लाख रुपये असे एकूण ६९१.७० लाख रुपयांची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले. कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामात ३२५.१० लाख क्विंटल उसाची खरेदी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने बिले देण्याचे निर्देश दिले.
आगामी गळीत हंगामाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह, शामली कारखान्याचे सह उपाध्यक्ष प्रदीप कुमार, ऊस महाव्यवस्थापक बलधारी सिंह, ऊन कारखान्याचे युनिट हेड अवनीश कुमार, महाव्यवस्थापक कुलदीप पिलानिया, थानाभवनचे युनिट हेड जी. व्ही. सिंह उपस्थित होते.