पाटणा : बिहार सरकारने पुराचा फटका बसलेल्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज घेऊन नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऊस उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांनी सांगितले की कृषी विभागाच्या माध्यमातून मदत देण्याची प्रक्रिया करण्याचा सरकारचा निर्णय आहे. कृषी विभागाचे सचिव एन. सरवन कुमार यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांना संबंधित जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कृषी पदाधिकाऱ्यांकडून नुकसानीबाबतची माहिती जमा करण्यास सांगण्यात आले आहे. लवकरच नुकसान भरपाई देण्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल. शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी वेबसाईट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेबसाईट तयार होताच शेतकऱ्यांकडून अर्ज घेण्यास सुरुवात केली जाईल.
ऊस उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांनी सांगितले की, २०२०-२१ या गळीत हंगामातील ९६ टक्के ऊस बिले अदा करण्यात आली आहेत. हरिनगर, नरकटियागंज, लौरिया आणि सुगौली या चार कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के पैसे दिले आहेत. उर्वरीत साखर कारखान्यांना कोणत्याही परिस्थितीत ३० जुलैपर्यंत पैसे देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांकडून ऊस विकास योजनेअंतर्गत प्रमाणित बियाण्यांबाबत ३० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कृषी सचिवांनी या वाढलेल्या मुदतीत आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रजातीच्या उसाची लागण करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. अशा पद्धतीने मुख्यमंत्री ऊस विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वाटपासाठी अनुदान दिले जाईल. इथेनॉल उत्पादनासाठी चांगल्या प्रजातीच्या उसाची लागवड एक लाख हेक्टरने वाढविण्याच्या सूचना साखर कारखान्यांच्या प्रशासनाला दिल्या गेल्या आहेत. चांगल्या प्रजातीच्या उसाची लागण करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link