पॅरिस : फ्रान्समध्ये पेट्रोल इंजिनांना इथेनॉलवर चालविण्यासाठीच्या कीटची विक्री वाढली आहे. वाहन चालकांनी पेट्रोलच्या वाढत्या दरामुळए इथेनॉलचा वापर वाढविण्यावर भर दिला आहे. याबाबत मार्केट लिडर फ्लेक्स फ्यूएल एनर्जी डेव्हलपमेंटने सांगितले की मार्चच्या पहिल्या २२ दिवसांतच त्यांनी ६४०० रुपांतरम कीटचे वितरण केले आहे. ही कीटची संख्या फेब्रुवारीत महिन्यातील ३४६८ कीटच्या तुलनेत ८० टक्के तर जानेवारीच्या २१६६ किटच्या तुलनेत तिप्पट आहे.
फ्रान्समधील इथेनॉल उत्पादक समूह एसएनपीएएचे महासचिव सिल्वेन डेमोरेस यांनी सांगितले की, आता लोकांना वाटत आहे की, इथेनॉलच्या वापराकडे वळण्याची योग्य वेळ आली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे पाश्चिमात्य देशांनी त्यांच्यावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यातून निर्माण झालेल्या पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे या महिन्यात गॅसोलीनच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त पर्याय शोधण्याकडे आपले लक्ष वळवावे लागले आहे. युरोप विकासचे फ्लेक्स फ्यूल प्रमुख जेरोम लुबर्ट यांनी सांगितले की, फ्रान्समध्ये रुपांतरण कीटच्या मागमीतील वाढ देशाच्या काही भागात अनुदानामुळे झाली आहे. त्या अनुदानात हे कीट बसविण्याचा खर्च समाविष्ट केला आहे.