प्रत्यक्ष कर संकलनाची तात्पुरती आकडेवारी स्थिर वाढ नोंदवत आहे. 10 फेब्रुवारी 2024 पर्यंतचे प्रत्यक्ष कराचे एकूण संकलन 18.38 लाख कोटी रुपये असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा ते 17.30% जास्त आहे. प्रत्यक्ष कर संकलन, निव्वळ परतावा मिळून 15.60 लाख कोटी रुपयांची नोंद झाली असून ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 20.25% जास्त आहेत. हे कर संकलन आर्थिक वर्ष 2023-24 च्या प्रत्यक्ष करसंकलनाच्या एकूण सुधारीत अपेक्षेपैकी 80.23% इतके आहे.
कंपनी आयकर (सीआयटी) आणि वैयक्तिक आयकर (पीआयटी) मिळून झालेले एकूण महसूल संकलन देखील स्थिर वाढ दर्शवते. सीआयटीसाठी वाढीचा दर 9.16% आहे तर पीआयटीसाठी 25.67% (केवळ पीआयटी) आणि 25.93% (एसटीटीसह पीआयटी) एवढा आहे. परताव्याच्या समायोजनानंतर, सीआयटी संकलनातील निव्वळ वाढ 13.57% आहे आणि पीआयटी संकलनातील 26.91% (केवळ पीआयटी), तर 27.17% (एसटीटीसह पीआयटी) एवढी आहे.
1 एप्रिल 2023 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 2.77 लाख कोटी रुपये एवढी परताव्याची रक्कम जारी करण्यात आली आहे.
(Source: PIB)