जालना:घनसावंगी तालुक्यासह तीर्थपुरी परिसरातील अनेक गावांत खरीप हंगामातील पिकांमध्ये रानडुकरांनी हैदास घातला आहे.रानडुकरांनी ऊस पिकाचे सर्वाधिक नुकसान केले आहे. शेतकऱ्यांनी या रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपायोजना केल्या आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा आणि नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तीर्थपुरी व परिसरासह तालुक्यात समर्थ व तीर्थपुरी येथे सागर सहकारी साखर कारखाना तर देवी दहेगाव येथे समृद्धी शुगर्स साखर कारखाना आहे.त्यामुळे तालुक्यातील गावामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गोदावरी नदी व पैठणच्या डाव्या कालव्याचे पाणी पाइपलाइनद्वारे आणून अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती बागायती केली आहे.मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली. कापूस, सोयाबीन आणि इतर पिकेही घेतली जातात.आता रानडुक्कर ऊसासह इतर पिकांत धुमाकूळ घालून प्रचंड नुकसान करत आहेत.शेतकऱ्यांनी पिकांच्या रक्षणासाठी तारेचे कुंपण करणे, जाळी बांधणे, पिकांच्या बाजुने साड्या बांधणे, वन्य प्राण्यांना भीती दाखवण्यासाठी वेगवेगळे भोंगे मशीन बसवणे आदी प्रयोग केले आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.