केनियाच्या बुसिया काउंटी मध्ये मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. जे शेतकरी अपला कच्चा माल बुसिया साखर कारखान्याला पोचवतात, ते नंबले, मलाबा आणि फुन्युला च्या उप-काउंटी येथील आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस सुरुच आहे आणि यामुळे काउंटी मध्ये ऊसाच्या शेतापासून कारखान्यापर्यंत जाणारा रस्ता खराब झाला आहे. ज्यामुळे ऊसाला कारखान्यापर्यंत नेणे कठीण झाले आहे. कारखानदारांना विशेष व्यवस्था केल्याशिवाय पर्याय नाही ,कारण मातीमध्ये अडकलेल्या ट्रॅक्टर्सना कारखान्यापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
बुसिया साखर कारखान्याचे संचार अधिकारी स्टीफन मुल्ला यांनी सांगितले की, पावसाने कारखान्याच्या संचालनावर नकारात्मक परिणाम केला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.