कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा, कुंभी-कासारी, ‘दत्त-दालमिया’कडून सर्वाधिक ३,३०० रुपये एफआरपी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी प्रतिटन ३ हजार ५० रुपये एफआरपी कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने दिली आहे. जिल्ह्यातील १६ सहकारी व सात खासगी, असे एकूण २३ साखर कारखाने आहेत. साखर कारखान्यांनी त्यांच्या साखर कारखान्यांच्या साखर उताऱ्यानुसार एफआरपी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीपेक्षा जास्त दर द्यायचा असेल, तर वृत्तपत्रात जाहिरात देणे बंधनकारक आहे. त्यासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत. सध्यातरी दराबाबत पंचगंगा, कुंभी-कासारी, ‘दत्त-दालमिया’ हे तीन कारखाने आघाडीवर आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र पहिली उचल ३ हजार ७०० रुपये देण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी जाहीर केलेली एफआरपी आजरा (आजरा) ३ हजार १००, भोगावती (परिते) ३ हजार २००, छत्रपती राजाराम (कसबा बावडा) ३ हजार ५०, छत्रपती शाहू (कागल) ३ हजार १००, दत्त (शिरोळ) ३ हजार १४०, दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) ३ हजार २००, जवाहर (हुपरी) ३ हजार १५०, सदाशिवराव मंडलिक (हमीदवाडा) ३ हजार १००, कुंभी-कासारी (कुडित्रे) ३ हजार ३००, पंचगंगा (इचलकरंजी) ३ हजार ३००, शरद सहकारी (नरंदे) ३ हजार १५०, वारणा (वारणानगर) ३ हजार २२०, अथणी शुगर (सोनवडे-बांबवडे) ३ हजार २२०. डॉ. डी. वाय. पाटील (गगनबावडा) ३ हजार १५०, दालमिया (आसुर्ले-पोर्ले) ३ हजार ३००, गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी) ३ हजार १५०, इको केन (चंदगड) ३ हजार १००, ओलम ग्लोबल (राजगोळी खुर्द) ३ हजार १००, सरसेनापती संताजी घोरपडे (कापशी) ३ हजार १००, ओमकार शुगर (फराळे, राधानगरी) ३ हजार २००, अथणी शुगर (तांबाळे) ३ हजार १००, अथर्व (चंदगड) ३ हजार १००, आप्पासाहेब नलवडे (गडहिंग्लज) ३ हजार १००.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.