महाराष्ट्रातील कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांकडून चांगल्या पद्धतीने उसाचे गाळप सुरू आहे. कोल्हापूरमध्ये सरासरी साकर उतारा १० टक्के आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीनुसार २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत कोल्हापूर विभागात ३७.८० लाख टन ऊस गाळप झाले आहे. तर ३७.७९ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. येथील साखर उतारा १० टक्के झाला आहे.
साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत एकूण १४७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ७३ सहकारी तसेच ७४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १३८.८७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आतापर्यंत १२२.६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.८३ टक्के इतका आहे.