कुशीनगर : यंदाही अतिवृष्टी आणि महापुरामुळे ऊस पिकाला फटका बसणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीसह साखर उद्योगावरही याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. सद्यस्थितीत शेतात असलेली पिके अति पाण्याने कुजू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणार नाही अशी शक्यता आहे.
सेवरही विकास खंड दरम्यान बाघाचौर, अहिरौलीदान, बीरवट कोन्हवलिया, बांकखास, फागूछापर खैरटिया आदी गावांमध्ये शेतकरी नारायणी नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऊस शेती करतात. गेल्या वर्षीही अतिवृष्टी आणि पुरामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना लाल सड रोगाच्या प्रादुर्भावा सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी २३८ या प्रजातीऐवजी ९३०१, ०११८ या प्रजातीचा ऊस लावला. मात्र, हा ऊसही वाळू लागला आहे.
शेतकरी दुधनाथ सिंह यांनी सांगितले की, आठ एकरात त्यांनी ९३०१ आणि ०११८ प्रजातीचा ऊस लावला होता. पूर तसेच पाणी साठल्याने पिक वाळू लागले आहे. शेतकरी सुरेंद्र सिंह म्हणाले, वेळेआधीच आलेला पूर आणि पावसामुळे दोन एकरातील ऊस कुजू लागला आहे. यावर्षी पाऊस आमच्यासाठी शाप ठरला आहे. शेतकरी रमेश सिंह यांनी सांगितले की, एक एकर ऊस वाळला आहे. वेळेआधीच पूर आल्याने भाताची लावणही करता आलेली नाही. शेतकरी देवेश यांनी सांगितले की, यावर्षीचा खर्चही निघणे मुश्किल आहे.
सेवरही विकास खंडचे मोहन बसडीला गावातील सलेमगड-अहिरौली दान रस्त्यावर कचऱ्यामुळे पाणी अडले आहे. मॅनेजर चौहान, रामजी, रविंद्र, इंद्राशन शर्मा यांनी सांगितले की, सलेमगड बाजारातील कचरा पूलावरुन फेकला जातो. त्यामुळे दुर्गंध सुटत असल्याने साफसफाई होत नाही. सरपंच ओमप्रकाश मिश्रा यांनी जेसीबीद्वारे सफाई केली जाईल असे सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link