मध्य प्रदेशात ऊस शेतीचे क्षेत्र घटले, कामगार टंचाईमुळे शेतकरी नाराज

श्यामपूर : तीन दशकापूर्वी ग्रामीण भागात ऊस हे नकदी पिक मानले जायचे. ऊसापासून गूळ, साखर आणि इतर पदार्थ तयार होतात. हळूहळू शेतकरी ऊस शेती कमी करत चालले आहेत. आता अशी स्थिती आहे की, काही गावातील एक शेतकरी उसापासून गूळ तयार करतो. त्यामुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. तकिया गावातील शेतकरी दरवर्षी दीड एकर ऊस पिकवतात. त्यांनी सांगितले की, यापासून उत्पादीत केलेला ३० क्विंटल गूळ विक्रीसाठी शेतकरी कुठेही जात नाहीत. लोक त्यांच्या घरी येऊन नेतात. शेतकरी फूल मियाँ यांनी सांगितले की, गूळ खरेदीसाठी आता मुंबईहूनही लोक येतात. ऊस हे इतर पिकांच्या तुलनेच फायदा मिळवून देणारे असले तरी त्यासाठी मोठे मनुष्यबळ लागते. त्यामुळे शेतकरी यापासून दूर चालले आहेत असे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकरी अचल सिंह मेवाडा, महेंद्र दांगी, नर्मदा दांगी यांनी सांगितले की, सिहोर साखर कारखाना बंद झाल्यामुळे उसाला बाजारभाव मिळत नाही. खरेदी करण्यास येणारे मनमानी दर सांगतात. खरेतर शेतकऱ्यांना सरकारने प्रोत्सहन देण्याची गरज होती. गूळ निर्मितीसाठी अधिक कामगार लागतात. त्यामुळे शेतकरी त्यापासूनही दूर चालले आहेत. तकीया गावातील फुलमियां यांनी सांगितले की, मेहनत अधिक आणि नफा कमी असल्याने ऊस क्षेत्र घटू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here