मेरठमध्ये साखर कारखान्यांनी थकवली बिले, रालोदचा आंदोलनाचा इशारा

मेरठ : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला आहे. मात्र, त्याचे पैसे दिले जात नसल्याचा मुद्दा राष्ट्रीय लोक दलाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. रालोदचे कार्यकर्ते सकाळी मोठ्या संख्येने एकत्र जमले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी प्रचंड उन्हाचा तडाखा असताना विज कपात सुरू असल्याचा मुद्दा मांडला. स्थानिक प्रशासनाकडून विंधनविहिरींची बिले अद्याप पाठवली जात असल्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राष्ट्रीय लोकदलाचे पदाधिकारी चौधरी चरण सिंह पार्कमध्ये एकत्र जमले. कार्यकर्त्यांनी तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना सांगितले की, या समस्या लवकरात लवकर सोडवल्या गेल्या नाहीत, तर आंदोलन केले जाईल. त्याच्या परिणामांची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारसह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर असेल.

शेतकऱ्यांना अद्याप उसाचे पैसे मिळालेले नाहीत. गळीत हंगाम संपुष्टात येऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत. आता कारखान्यांनी नव्या गाळप हंगामाची तयारीही सुरू केली आहे. तरीही शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. मुलांच्या शैक्षणिक खर्चासह दैनंदिन कामातही अडचणी येत आहेत. मात्र, कारखान्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे, याकडे रालोदने लक्ष वेधले. शिवाय, मेरठमध्ये सतत विजेची कपात केली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here