जालंधर : द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुकेरिया साखर कारखान्यावर इतर कारखान्यांच्या तुलनेत या हंगामात शेतकऱ्यांची सर्वाधिक थकबाकी आहे. थकबाकी देण्याच्या मागणीसाठी संयुक्त शेतकरी संघाच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनी गेल्या शनिवारी कारखान्याच्या गेटवर चक्काजाम आंदोलन करीत सहा तास आंदोलन केले. कारखाना प्रशासनाने १२ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना चार हप्त्यांमध्ये ११७ कोटी रुपयांची थकबाकी दिली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले.
किसान संघर्ष समितीचे सतनाम साहनी यांनी सांगितले की, भोगपूर आणि बटरन साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर मिळत नहीत. कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस खरेदी केल्यानंतर १४ दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, भोगपूर कारखाना शेतकऱ्यांना वेळेवर बिले देण्यास टाळाटाळ करीत आहे. बटरन साखर कारखान्याने यापूर्वी ५ जानेवारी रोजी अखेरची बिले दिली होती. कारखान्याकडे गेल्या ५३ दिवसांची थकबाकी आहे. फगवाडा साखर कारखान्याने चालू हंगामात ५ फेब्रुवारीपर्यंत बिले दिली आहेत, असे त्यांनी सांगितले. साहनी म्हणाले की, २०२१-२२ या हंगामातील ३३ कोटी रुपये अद्याप थकीत आहेत.