सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सध्या पाच सहकारी व १२ खासगी कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. आतापर्यंत सहकारी कारखान्यात ४ लाख ६१ हजार २८१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून ३ लाख ६२ हजार ५०९ क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. तर खासगी कारखान्यांनी ५ लाख ७४ हजार ५९ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ३ लाख ७१ हजार ५९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.३३ तर खासगी कारखान्यांचा उतारा ६.४७ टक्के आहे. ऊस गाळपात खासगी साखर कारखाने आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
एक डिसेंबरअखेर जिल्ह्यातील ३४ पैकी १७ कारखाने चालू झाले आहेत. त्यांनी एकूण १० लाख ३५ हजार ३४० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर ७.०९ टक्के सरासरी साखर उताऱ्याने ७ लाख ३४ हजार ९० क्विंटल साखर उत्पादन झाले असल्याचे साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात सहकार महर्षी कारखाना गाळप व साखर उत्पादनात सध्यातरी आघाडीवर आहे. पांडुरंग कारखाना दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, राज्यात यंदाच्या गळीत हंगामात राज्यात सहकारी व खासगी मिळून आतापर्यंत १२४ कारखान्यांनी साखर उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये ६७.८२ लाख टन उसाचे गाळप होऊन ५०.०८ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्याचा साखर उतारा ७.३८ टक्के आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा साखर उताऱ्यात अग्रभागी राहिला आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.