सांगली : जिल्ह्यातील पलूससह काही तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. पलूस तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने शेकडो एकर उसास फटका बसला आहे.. पावसामुळे उसासह केळी, भाजीपाला याबरोबरच अन्य पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे शेकडो एकर उसाचे पीक भुईसपाट झाले आहे.
पलूस तालुक्यात ऊस उत्पादनात कमालीची घट होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. वळवाच्या पावसाने ऊस पीक उन्मळून कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.