पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत, ११ मे २०२१ अखेर १८४ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर ६ कारखाने सुरू आहेत.
साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ११ मे २०२१ अखेर १९१ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात १०११.३१ लाख टन उसाचे गाळप करून १०६१.१८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४९ टक्के इतका आहे.
साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागात ४३ कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३७ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. नांदेड विभागातील २६, पुणे विभागातील ३१ कारखाने बंद झाले आहेत. अहमदनगर विभागातील २४, औरंगाबाद विभागातील १८ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. अमरावतीमध्ये २, नागपूरमधील ३ कारखाने बंद झाले आहेत.