मुंबई: एकीकडे जिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्याच दरम्यान महाराष्ट्रातून काही दिलासाजनक बातम्या येत आहेत. महाराष्ट्रात कोरोना ग्रस्त केवळ सामान्य लोक नाहीत तर आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी देखील होते. पण गेल्या दोन दिवसांमध्ये एकही कोरोनामुळे मृत्यू चे प्रकरण समोर आलेले नाही.
महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांमध्ये पोलिसांमध्येही कोरोंनाग्रस्तांच्या नव्या नोंदी किंवा मृत्यूची नोंदणी झालेली नाही.
या महामारीमुळे 34 पोलिसांचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये आतापर्यंत 2,562 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना संपवण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दिवस रात्र काम करत आहे.
भारतामध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आणि याचा सर्वात मोठा परिणाम महाराष्ट्रावरच झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.