उत्तराखंडमध्ये साखर कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे २३१.४५ कोटी रुपये

डेहराडून : उत्तराखंडमधील चार साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २३१.४५ कोटी रुपये थकवले आहेत. यापैकी इकबालपूर साखर कारखान्याकडे सर्वाधिक १७९.३० कोटी रुपये थकीत आहेत.

राज्य विधानसभेच्या येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात भाजप सदस्य देशराज कर्णवाल यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ऊस विकास मंत्री स्वामी यतिश्वरानंद यांनी सांगितले की, हरिद्वार जिल्ह्यातील इकबालपूर साखर कारखान्याने गळीत हंगामा २०१७-१८ आणि २०१८-१९ मधील १७९.३० कोटी रुपये थकीत आहेत. तर २०२०-२१ या हंगामातील लिब्बरहेडी कारखान्याकडे १८.८३ कोटी आणि लक्सर कारखान्याकडे ३३.३२ कोटी रुपये थकीत आहेत.
गळीत हंगाम २०१९-२० मधील ऊसाचे सर्व पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांनी सांगितले की, इकबालपूर कारखान्याविरोधात उत्तराखंड उच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे. तेथून पुढील आदेश मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल. लिब्बरहेडी आणि लक्सर कारखान्यांकडून उर्वरीत ऊस बिले दिली जावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आगामी गळीत हंगामातील ऊस दराबाबत विचारणा केल्यावर मंत्री यतीश्वरानंद म्हणाले, यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या निर्णयाच्या आधारावर ऊस दर जाहीर केला जाईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here