पीएम किसान निधी: जाणून घ्या कोणत्या कारणांनी रद्द होऊ शकतो हप्ता

नवी दिल्ली : केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून देशभरात कोट्यवधी शेतकऱ्यांचे आर्थिक सशक्तीकरण करीत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची मदत दिली जाते. हे पैसे दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या समान तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हे पैसे थेट जमा होतात. हे पैसे शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदीसाठी व्यक्तीगत खर्चासाठी वापरले जातात. या योजनेचा लाभ आतापर्यंत १३ हप्त्यांमधून शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. लवकरच सरकार १४ व्या हप्त्याची घोषणा करू शकते.

एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पीएम किसान योजनेच्या काही लाभार्थ्यांना गेल्यावर्षीपासून २००० रुपयांचा हप्ता मिळवण्यात समस्या येत आहेत. खास करुन ११ व्या हप्त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळू शकत नाही अशी स्थिती आहे. ई-केवायसी, आधार सिडींग आणि लँड सिडींगची प्रक्रिया पूर्ण न करणे ही यामागील कारणे आहेत. सरकारने ११ वा हप्ता जारी केल्यानंतर अनेकजण चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याचे दिसले होते. त्यानंतरच्या छाननीत १ कोटी रुपयांहून अधिक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये लाखो शेतकरी अपात्र ठरले होते. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी, भूमी अभिलेखांची पडताळणी आणि आधार सीडींगची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर अशांनी अधिक माहितीसाठी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन- १५५२६१, १८००११५५२६ या टोल फ्री क्रमांकावर- ०११-२३३८१०९२ वर सुद्धा कॉल करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here