यशवंत कारखाना निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीने उडवला प्रस्थापितांचा धुव्वा

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या तब्बल १५ वर्षांनंतर झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांचा पराभव केला. यशवंत कारखाना निवडणुकीत प्रस्थापितांचा पराभव झाला असून शेतकरी विकास आघाडीने १८-३ असा त्यांचा धुव्वा उडविला आहे. निवडणुकीसाठी पारंपरिक विरोधकांची झालेली दिलजमाई मतदारांना रुचली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दिग्गजांना पराभव पाहावा लागला असल्याचे म्हटले जात आहे.

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात सोमवारी मध्यरात्री २१ जागांची मतमोजणी पूर्ण झाली. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेलप्रमुख प्रकाश जगताप यांनी हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळींनी बांधलेली मोट मोडीत काढली आहे.

निकालानंतर एकूण १८ जागांवर शेतकरी विकास आघाडीला मोठा विजय मिळाला, तर रयत सहकार पॅनेलला केवळ ३ जागा मिळाल्या. संतोष आबासाहेब कांचन (५६३९), विजय किसन चौधरी (५३०५), मोरेश्वर पांडुरंग काळे (५२५२), राहुल सुभाष घुले (५४८२), किशोर शंकर उंद्रे (५२१७), सुभाष चंद्रकांत जगताप (५४६६), सागर अशोक काळभोर (२०२), रत्नाबाई माणिक काळभोर (५६४), हेमा मिलिंद काळभोर (५४४५) दिलीप नाना शिंदे (५६९५), मोहन खंडेराव म्हेत्रे (४६१८), कुंडलिक अर्जुन थोरात (६०७५) हे विजयी झाले. रयत सहकार पॅनेलकडून नवनाथ काकडे, सागर काळभोर, शामराव कोतवाल हे तीनच उमेदवार विजयी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here