विघ्नहर कारखान्याच्या आसवनी, इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणाचे १३ रोजी लोकार्पण : अध्यक्ष सत्यशील शेरकर

पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार असल्याची माहिती विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे असणार आहेत. अध्यक्षस्थानी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील अशी माहितीही शेरेकर यांनी दिली.

या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार दिलीप ढमढेरे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार शरद सोनवणे, सभापती संजय काळे, भाजप नेत्या आशाताई बुचके, माऊली खंडागळे आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फाटाफुटीनंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शरद पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. त्यामुळे हे दोघेही या शेतकरी मेळाव्यामध्ये काय बोलणार? याबाबत उत्सुकता वाढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here