कवडरा : कवडरा परिसरात ऊस शेतीचे प्रमाण कमी-जास्त असल्याने शेतकरी इतरांच्या जनावरांच्या चार्यासाठी शेतात जाऊन बांड्या नेण्यासाठी गर्दी करत आहे. ऊस बांड्याला शेतकर्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. शंभर रुपयात पंधरा ते सतरा भेळे ऊस तोडणारे गाडीवान देतात.
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर परिसरात सध्या ऊसतोड सुरू आहे. परिसरातून ऊस शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील कारखान्याला जातो. ऊसतोडणी कामगार दिवाळीपासून परिसरात दाखल झाले आहेत. दुभत्या जनावरांना चारा म्हणून बांडे खाऊ घालतात. यामुळे दूध उत्पादनात वाढ होते.
परिसरातील दुग्ध व्यावसायिक ऊस बांडे खरेदीला पसंती देतात. ऊस बांडे खरेदी करण्यासाठी सकाळी व सायंकाळी शेतावर गर्दी होत आहे. परिसरातील ऊसतोडणी हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. परिसरात ऊसाचे क्षेत्र यावर्षी खूप कमी आहे.