कोल्हापूर, ता 12 : डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण सुरू आहे. त्यामुळे रुपयाला सावरण्यासाठी केंद्र सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दूरसंचार उपकरणांवर 10 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आयात शुल्क वाढवण्याचा आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गेल्या महिन्यातच काही वस्तूंवरील आयात शुल्क वाढवले होते. दरम्यान आता एअर कंडिशनर, हिरे, फुटवेअर, वॉशिंग मशीन, आणि जेट इंधनासह आणखी वस्तूंवरील आयात शुल्क वाढविले होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्या महिन्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दूरसंचार उपकरणांवर आयात शुल्क वाढविण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात (2016-17) या 19 वस्तूंची आयात केली जात जात होती. ही आयात तब्बल 85 हजार कोटी रुपयांच्यावरती होती. यावर्षीच्या याआयातीमधून सरकारला 3,400 कोटींपर्यंत महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.