महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मका, गहू, हरभरा पिकांच्या आवकेत वाढ

पुणे : राज्यातील बाजार समित्यांमध्ये मका, गहू, हरभरा या पिकांच्या आवकेत वाढ झाली आहे. आजच्या बाजारभावानुसार स्थानिक गव्हाला प्रती क्विंटल सरासरी २२०० रुपये भाव मिळाला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने अनेक भागातील हरभरा आवक घटली आहे. त्यामुळे बाजारात देखील हरभरा पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. तर लासलगाव निफाड बाजार समितीत मका पिकास सरासरी २२२५ रुपये दर मिळाला आहे.

लासलगाव- निफाड बाजार समितीत २१८९ या जातीच्या गव्हाची ५३ क्विंटल आवक झाली. या गव्हाला किमान २३६१ रुपये तर सरासरी २७०० रुपये बाजारभाव मिळाला. अकोला बाजार समितीत लोकल गव्हाची १८६ क्विंटल आवक झाली. या गव्हाला प्रती क्विंटल १९०० ते सरासरी २२८५ रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत हरभरा पिकाची ४३ क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत प्रती क्विंटलला किमान ६६०० तर सरासरी ७०५० रुपये दर मिळाला. लासलगाव निफाड बाजार समितीत मका पिकास सरासरी २२२५ रुपये दर मिळाला. अमरावती बाजार समितीत लाल मका पिकास किमान २००० तर सरासरी २१०० रुपये इतका बाजारभाव मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here