गुरदासपूर : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या हस्ते गुरदासपूर सहकारी साखर कारखान्यात ४१३.८० रुपयांची गुंतवणूक करून सध्याची २००० टीसीडीची क्षमता ५००० टीसीडी करण्याच्या योजनेची कोनशीला बसवण्यात आली. या नंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री चन्नी म्हणाले, की, कारखान्याच्या वाढत्या क्षमतेमुळे उसाच्या गाळपासह राज्य ग्रीडसाठी २० मेगावॅट वीजेचे उत्पादन होणार आहे.
मुख्यमंत्री चन्नी म्हणाले, या योजनेसाठी ४१३.८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यातून प्लांट, मशीनरी आणि इतर कामांवर ३६९ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. याशिवाय १२० केएलपीडी क्षमतेच्या इथेनॉल प्लांटची स्थापना केली जाईल. यासाठी आधीच निविदा प्रक्रीया पूर्ण झाली आहे. ५००० टीसीडी क्षमतेसह २८ मेगावॅट सह वीज प्रकल्पही कारखान्याला मिळेल. कारखाने केवळ वीज उत्पादन करणार नाहीत तर सल्फररहीत साखरेचे उत्पादन होईल.
उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी गुरुदासपूर साखर कारखाना सहा कारखान्यांना ऊस पुरवठा करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. रंधावा यांनी यापूर्वीच्या अकाली दल-भाजप सरकारने ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांच्या हितासाठी जाणुनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप रंधावा यांनी केला. तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पंजाब आणि सहकार क्षेत्राचे खूप नुकसान केल्याचे ते म्हणाले. पंजाब आतापर्यंतची सर्वात मोठी ६०० कोटी रुपयांची योजना करण्यात येत आहे. गुरुदासपूरला २१५ कोटी रुपयांचा इथेनॉल प्लांट मंजूर झाल्याचेही ते म्हणाले.