लखनौ : गेल्या एक वर्षामध्ये अक्षय्य इंधन उत्पादन करणाऱ्या डिस्टिलरींची संख्या अधिक असल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये उत्तर प्रदेशातील इथेनॉल उत्पादन १३५ कोटी लिटरचा आकडा पार करेल, अशी शक्यता आहे. केंद्र सरकारकडून निर्धारित १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य आहे. गेल्या आर्थिक वर्षात, २०२१-२२ मध्ये राज्यातील डिस्टिलरींनी ९७ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले होते.
अबकारी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी सांगितले की, गेल्या एक वर्षात मोठ्या संख्येने डिस्टिलरींनी इथेनॉल उत्पादन सुरू केले आहे. आणि नवीकरणीय इंधन उत्पादनासाठी अतिरिक्त ऊसाचा वापर केला जात आहे.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, राज्यातील डिस्टिलरींनी ३० नोव्हेंबरअखेर ८८ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. मध्य ऑक्टोबर ते मध्य एप्रिल या कालावधीत ऊस गळीत हंगामाचा मुख्य कालावधी आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण उत्पादनात ४० टक्के वाढीचे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे.