ढाका : जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे देशांतर्गत किरकोळ बाजारपेठेतही साखरेच्या दरात वाढ सुरू झाली आहे. बांग्लादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने (बीएसएफआयसी) दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी २०१९-२० या हंगामात फक्त ८२,००० टन साखरेचे उत्पादन केले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची वार्षिक मागणी १.८ मिलियन टन इतकी आहे.
सरकारी साखर कारखाने बंद असल्याने देशातील ९० टक्के साखरेची मागणी आयात केलेल्या साखरेतून पूर्ण होते. स्थानिक ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून किमतीमध्ये दरवाढ दिसू लागली आहे. न्यू मार्केट, कारवा बाजार, हटिरपूल कच्चा बाजार, जत्रा बाडी या प्रमुख क्षेत्रात ग्राहक प्रती किलो ७०-८५ टीके दराने साखर खरेदी करीत आहेत.
बांग्लादेश शुगर डिलर बिझनेस असोसिएशनचे सदस्य मुस्तफिजूर हुसेन यांनी सांगितले की, देशात बहुतांश साखर कच्च्या स्वरुपात आयात केली जात असल्याने दरवाढ झाली आहे. आयात साखरेवर रिफायनरीत प्रक्रिया करून विक्री केली जाते. आमच्याकडे बहूसंख्य कारखाने धोरणात्मक बाबींमुळे बंद आहेत. दुसरीकडे साखरेचा बाजार जागतिक स्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारापत दरवाढ होईल, तेव्हा स्थानिक बाजारपेठेतही त्याचा परिणाम दिसून येईल. एप्रिल आणि जुलै यांदरम्यान दक्षिण-मध्य ब्राझीलमध्ये साखर उत्पादनातील घसरणीमुळे दरात सातत्याने वाढ झाली होती. यामुळे चालू हंगाम २०२१-२२ मध्ये जागतिक अतिरिक्त साखरसाठा कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दरात तेजी आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link