राज्य बॅंकेचा निर्णय : 150 कोटींचा निधी मिळणार
कोल्हापूर, दि. 14 ऑगस्ट 2018 : साखर मूल्यांकन कमी असल्याने कारखान्यांची आर्थिक गणित कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखरेच्या मूल्यांकन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला
आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना 150 कोटी रुपयांचा जादा निधी उपलब्ध होणार आहे. याचा साखर कारखान्यांसह शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.
वाढलेल्या मूल्यांकन मुळे राज्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम
देण्यासोबतच कारखान्यांना पूर्वहंगामी खर्च भागविणे सोयीचे होणार आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी साखरेचे
दर 3500 रुपये प्रतिक्विंटलवरून
2400 ते 2450 रुपयांपर्यंत घसरले होते. याचा फटका साखर कारखान्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला होता. राज्य बँकेने साखर कारखान्यांना केलेल्या कर्जपुरवठ्यामध्ये अपुरा दुरावा निर्माण झाला. त्यामुळे कारखान्यांची बँक खाती
अनुत्पादक कर्जाच्या वर्गवारीत (एनपीए) जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. परिणामी साखर कारखान्यांना यंदाचा 2018-19 चा गाळप हंगाम सुरू
करण्यास अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.
या संदर्भात केंद्र सरकारने साखरेचे मूल्यांकन 2900 रुपये प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कारखान्यांना 90 टक्क्यांपर्यंत उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही
ऊस उत्पादकांना हमीभाव देण्यासाठी
कारखान्यांना निधी कमी पडत होता.ही बाब निदर्शनास आल्यानंतर राज्य बँकेने गेल्या 90 दिवसांच्या सरासरीवर
साखरेचे मूल्यांकन 2900 रुपयांवरून
3000 रुपये करण्याचा निर्णय
घेतला आहे.
या निर्णयामुळे बँकेचा कर्जपुरवठा
असलेल्या साखर कारखान्यांना सुमारे 150 रुपयांचा जादा निधी उपलब्ध होणार आहेत्यामुळे शेतकच्यांना एफआरपी देणे शक्य होईल; तसेच येत्या गाळप हंगामात पूर्वहंगामी खर्च
करण्यासाठी निधी उपलब्ध होईल, असे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी स्पष्ट केले.