कर्नाटकमध्ये चालू हंगामात साखर उत्पादनात वाढ

महाराष्ट्राप्रमाणे या हंगामात कर्नाटकमध्येही साखर उत्पादनात वाढ दिसून आली आहे. कर्नाटकमध्ये चालू हंगामात आतापर्यंत सर्वाधिक साखर उत्पादन झाल्याचे म्हटले जात आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (ईस्मा) म्हणण्यानुसार कर्नाटकमध्ये ३१ मार्च २०२२ पर्यंत ७२ साखर कारखान्यांनी ५७.६५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्रातप्रमाणेच कर्नाटकमध्येही आता आतापर्यंत हे सर्वोच्च साखर उत्पादन आहे. राज्यातील ७२ साखर कारखान्यांपैकी ५१ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. अद्याप २१ कारखाने सुरूच आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ६७ साखर कारखान्यांनी ४२.३८ लाख टन साखर उत्पादन केले होते. गेल्या वर्षी ३१ मार्च २०२१ पर्यंत ६७ साखर कारखान्यांपैकी ६६ कारखान्यांच्या गाळप हंगामाची समाप्ती करण्यात आली होती. केवळ एक कारखाना या वेळेपर्यंत सुरू होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here