चालू गळीत हंगामात देशभरात साखर उत्पादनात वाढ दिसून आली आहे. याचबरोबर तामिळनाडूमध्ये साखर उत्पादन वाढले आहे.
इंडियन शुगर मील असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये चालू गळीत हंगामात सहभागी झालेल्या २९ साखर कारखान्यांपैकी ५ साखर कारखान्यांनी आतापर्यंत आपले गाळप समाप्त केले आहे. तर या साखर कारखान्यांपैकी काही कारखाने या वर्ष अखेरीस विशेष गळीत हंगामात काम करू शकतात. ३० एप्रिल २०२२ पर्यंत राज्यातील साखर उत्पादन ८.४० लाख टन झाले आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत २७ साखर कारखान्यांनी ६.०४ लाख टन साखर उत्पादित केली होती. तर गेल्या वर्षी ३० एप्रिल २०२१ अखेर २७ पैकी ९ कारखान्यांनी आपले कामकाज बंद केले होते. तर १८ कारखाने सुरू होते. गेल्या वर्षी विशेष हंगामात तामिळनाडूमधील कारखान्यांनी २.१६ लाख टन साखर उत्पादन केले होते.