रामपूर : राज्यात माय फॅक्टर (मोदी-योगी फॅक्टर) लोकांना सुरक्षा, समृद्धी आणि सुशासन प्रदान करेल असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात आयोजित ‘चौपाल पे चर्चा’ कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने भ्रष्टाचार आणि अपराधांची विकृती, दंगलींच्या संस्कृतीला उद्ध्वस्त केले आहे.
यावेळी मंत्री नकवी यांनी भाजपचे बूथ प्रमुख, शेतकरी आणि ग्रामीण लोकांची चर्चा केली. उसाच्या मुद्यावर बोलताना मंत्री नकवी म्हणाले, २०१२-१७ या काळात राज्यातील शेतकऱ्यांना केवळ ९५,००० कोटी रुपये दिले गेले होते. २०१७ पासून आतापर्यंत यात वाढ होऊन १.५ लाख कोटी रुपये झाले आहेत. मोदी -योगी युगात तुष्टीकरणाचे धोरण सन्मान आणि विकासावर खास लक्ष देण्यासह बदलले गेले आहे असे ते म्हणाले. त्यामुळे सर्व वर्गांच्या समावेशाने सशक्तीकरण झाले आहे.
नकवी म्हणाले, गेल्या पाच वर्षात मोदी आणि योगी सरकारने चांगली कायदा व सुव्यवस्था, महत्त्वपूर्ण मुलभूत विकास, उच्च तंत्रज्ञानयुक्त उद्योग, गुणवत्ता, स्वस्त शिक्षण, आरोग्य सुविधांसोबत राज्यात गतीने परिवर्तन घडवले आहे. उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा मतदारसंघात सात टप्प्यात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ तसेच ७ मार्च रोजी मतदान होत आहे. मतमोजणी १० मार्च रोजी होईल.