परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ

परभणी : यंदा चांगला पाऊस झाल्याने परभणी जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. ग्रामीण भागात ऊस लागवडीची लगबग दिसून येत आहे. पूर्णा तालुक्यामध्ये यावर्षी ऊस लागवडीचे क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मोठी धरणे तुडुंब भरली आहेत. प्रामुख्याने येलदरी, सिद्धेश्वर त्यासोबतच दुधना त्यासोबतच गोदावरी नदीवर अवलंबून असलेली तीन ते चार बंधारेही यावर्षी तुडुंब आहेत. त्यामुळे सध्या पूर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीची लगबग दिसून येत आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये ऊसाची लागवड केल्यानंतर हा ऊस गाळपासाठी हंगाम २०२५-२६ साठी साखर कारखान्याकडे दिला जातो. त्यामुळे या महिन्यातील ऊसाची नोंदी अति महत्त्वाची असून शेतकऱ्यांना दहावा महिना गाठण्यासाठी व नोंदीसाठी महत्त्वाचा असल्यामुळे सध्या शेतकरी ऊस लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे मागील काही वर्षांपासून ऊस दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, ऊस दरामधून शेतकऱ्यांच्या बारमाही उत्पन्नाचे नियोजन साधले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ऊस लागवडीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. ऊसाला चांगला दर मिळत असल्यामुळे दिवसेंदिवस ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याचे तालुक्यामध्ये दिसत आहे.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here