संतकबीर नगर : बस्ती जिल्ह्यातील मुंडेरवा साखर कारखान्याकडे बस्ती आणि संत कबीर नगर जिल्ह्यातील शेतकरी ऊसाचा पुरवठा करतात. योगी सरकारच्या प्रयत्नांनी गेल्या तीन वर्षात साखर कारखान्याचे चित्र बदलले आहे. ऊस पुरवठ्याची सरासरी वाढली आहे. सध्याच्या गळीत हंगामात १० मार्चपर्यंत ३५ लाख ४६ हजार ०५४.०३ क्विंटल ऊस शेतकऱ्यांनी दिला आहे. शासनाकडून ऊस विकासासाठी स्थापन केलेल्या एलएसएसची टीम यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ऊसाचे प्रती हेक्टर ६४४.८४ क्विंटल उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात ६२०.५६ क्विंटल प्रती हेक्टर ऊस उत्पादन होते. साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एक मोठा भाग पुराच्या विळख्यात सापडतो. तेथील ऊस लागवडीसाठी काईदायी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सहकार्याने उसाची नर्सरी तयार केली आहे. साठलेले पाणी कमी झाल्यानंतर ऊसाची रोपे लावण्यात आली होती. सल्फर लेस साखर उत्पादनातही कारखान्याचे मोठे योगदान आहे.
मुंडेरवा साखर कारखान्यात २७ मेगावॅट विज उत्पादन यंत्रणाही आहे. चालू आर्थिक सत्रात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २८ हजार ६७१ मेगावॅट वीज उत्पादन झाले आहे. यापैकी १८ हजार ४८८ मेगावॅट वीज पॉवर ग्रीडला विक्री करण्यात आली आहे. तर आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये २८ हजार ५०७ मेगावॅट विजेची विक्री करण्यात आली होती. त्यातून कारखान्याला अतिरिक्त उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यास यातून मदत होते. यावर्षी जादा ऊस गाळप झाले आहे. आगामी काळात यात आणखी वाढ होईल. अधिक ऊस पुरवठ्यामुळे विजेचे उत्पादनही वाढणार आहे. ऊस विकास विभागाच्या प्रयत्नांनी शास्त्रशुद्ध शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून येते असे कारखान्याचे कार्यकारी संचालक ब्रजेंद्र द्विवेदी यांनी सांगितले.