काशीपूर : ऊस तथा साखर आयुक्त कार्यालयाच्यावतीने ऊस आणि साखर उताऱ्यात सुधारणा व्हावी यासाठी तंत्रज्ञानावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये ऊस विकास तथा साखर उद्योगाचे आयुक्त हंसा हत्त पांडेय यांनी सांगितले की, तंत्रज्ञान तसेच प्रगत प्रजातींमुळे उसाचे उत्पादन वाढेल.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किच्छा येथून आलेले प्रगतशील शेतकरी डॉ. सर्वजीत सिंह गौराया यांनी ऊसातील ऊती संवर्धनाची माहिती दिली. बाजपूर येथील दलजीत सिंग गौराया यांनी ऊस लागवडीवेळी येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली. लिब्बरहेडी येथील विजय पाल सिंह यांनी ऊसाची जैविक शेती, लक्सर साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी वसंत ऋतुमधील ऊस लागण तंत्रज्ञानाची माहिती दिली. पंतनगर कृषी संशोधन केंद्राचे डॉ. ए. एस. जीना, ऊस संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय कुमार, जनसंपर्क अधिकारी नीलेश कुमार, विजय कुमार, हरगोविंद सिंह, नवीन राणा, दर्शन सिंह, पुलविंदर सिंह, सुंदर सिंह, सतीश, सूरजपाल आदी उपस्थित होते.