संगरुरमध्ये गव्हाच्या उत्पादनात वाढ, नव्या प्रजातींना मिळतेय श्रेय

संगरुर आणि मालेरकोटला जिल्ह्यात गव्हाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या नव्या प्रजातींकडे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा वळविल्यामुळे गव्हाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ४,१७४ किलो प्रती हेक्टरवरुन वाढून ५,२७० किलो प्रती हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. सतत झालेला पाऊस आणि गारपीटीनंतरही उत्पादनात वाढ झाली आहे.

कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी संगरुर आणि मालेरकोटला जिल्ह्यात ७७ टक्के क्षेत्रात शेतकऱ्यांनी एचडी २९६७ आणि एचडी ३०८६ या प्रजातीच्या वाणाचा वापर केला. मात्र, या वर्षी ७२ टक्के क्षेत्रात डीबीडब्ल्यू २२२, डीबीडब्ल्यू १८७ आणि डीबीडब्ल्यू ३०३ सह नव्या प्रजातीच्या वाणाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धान्य मंडईत शेतकरी जसवंत सिंह ने बताया कि, माहिती मिळाल्यानंतर मी माझ्या सर्व १४ एकर जमिनीत गव्हाच्या नव्या प्रजातीचे वाण वापरले. त्यामुळे मला प्रती एकर उत्पादन अपेक्षेपेक्षा खूप अधिक मिळाले आहे. मला असे वाटते की, या वर्षीचे अधिक उत्पादन पाहता, पुढील वर्षी नव्या प्रजातीचा स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असेल.

संगरुरचे मुख्य कृषी अधिकारी (सीएओ) हरबंस सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी गव्हाच्या नव्या प्रजातीकडे आपला मोर्चा वळवला आहे आणि त्यांना आपले उत्पादन वाढविण्यास मदत मिळाली आहे. नव्या प्रजातींनीच गव्हाचे उत्पन्न अधिक वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका दर्शवली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाचट जाळण्याऐवजी योग्य व्यवस्थापन केले. आणि हवामानामुळेही गव्हाचे अधिक उत्पादन होण्यास मदत मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here