फारुखाबाद : कायमगंज विभागातील शेतकऱ्यांनी यंदा ऊस उत्पादनात आपली अधिकच रुची वाढल्याचे दाखवून दिले आहे. खरेतर या विभागातील साखर कारखान्याची गाळप क्षमता अद्याप वाढलेली नाही. सद्यस्थितीत जुन्या मशीनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून कारखाना चालविण्याचा प्रयत्न प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त ऊस गाळप केला जाईल, असे नियोजन करण्यात येत आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्यावेळी ५ हजार ११८ हेक्टरमध्ये ऊसाची लागवड करण्यात आली होती. यावेळी साधारणतः दिडशे हेक्टरमध्ये ऊस लागवड वाढली आहे. त्यामुळे आधीच्या तुलनेत जवळपास २ लाख क्विंटल ऊस उत्पादन वाढेल अशी अपेक्षा आहे. २६ नोव्हेंबर रोजी कारखाना प्रशासन गाळप हंगाम सुरू करू शकेल अशी शक्यता आहे. त्यासाठी मशीनची दुरुस्ती केली जात आहे. मशिनरीची चाचणी सुरू आहे. रंगरंगोटी केली जात आहे. कारखान्यात वजन काट्याची व्यवस्था पाहिली जात आहे. यावेळी १६ लाख क्विंटल उसाचे उद्दिष्ट आहे. कारखान्याचे सरव्यवस्थापक किशनलाल यांनी सांगितले की, यंदाच्या गाळप हंगामाची तयारी सुरू आहे. यंदा २६ नोव्हेंबर रोजी कारखाना सुरू होईल.