सूरत : दक्षिण गुजरात च्या विविध जिल्ह्यांमद्ये काम करणार्या प्रवासी ऊस तोडणी मजुरांसाठी एक चांगली बातमी आहे. मजुरीतील वाढीसाठी जवळपास तीन वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरु होता. याची दखल घेवून सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या वेतनामद्ये जवळपास 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यूनियनच्या नेत्यानीं सोंगितले की, वेतन वाढल्यामुळे जवळपास 2.5 लाख ऊस तोड मजुरांना लाभ होणार आहे.
मजूर अधिकर मंचाचे सल्लागार सुदिक कटियार यांनी सांगितले की, दक्षिण गुजरातच्या सहकारी साखर कारखान्यांनी बुधवारी ऊस तोड मजुरांची मजुरी 25 रुपये प्रतिटन वाढवून 280 रुपये प्रति टन केली आहे. ठेकेदारांना देण्यात येणारे कमीशनही 5 रुपयांनी वाढवून प्रति टन 55 रुपये केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ही वाढ करण्याची मागणी मजुर करत होते.
सहकारी कारखान्यांच्या श्रम पर्यवेक्षकानी , मुकादमांच्या बरोबर झालेल्या बैठक़मीध्ये वेतन वाढीची घोषणा केली . कटियार यांनी सांगितले की, मजुरी मद्ये वाढीमुळे जवळपास 2.5 लाख श्रमिकांना फायदा होईल, जे गुजरातच्या डांग, तापी आणि महाराष्ट्रा
च्या धुळे आणि नंदुरबार मधून प्रत्येक वर्षी ऊस तोडणीसाठी येतात.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.