थकीत ऊस बिलांसाठी साखर कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन

बस्ती : भारतीय किसान युनियनने मुंडेरवा साखर कारखान्याच्या गेटवर बैठक घेतली. त्यानंतर थकीत ऊस बिलांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. बस्ती येथे दुष्काळ जाहीर करण्यात यावा, मुंडेरवा साखर कारखान्याने थकीत ४० कोटी रुपयांची ऊस बिले व्याजासह द्यावीत, पिकांच्या विम्याची पूर्तता करावी, दुष्काळामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी निशुल्क वीज द्यावी, वीज विभागाकडून शेतकऱ्यांचा छळ बंद करावा आदी मागण्या या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. याबाबत साखर कारखान्याच्या प्रशासनाशी झालेली चर्चा निष्फळ ठरली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, नंतर सीआरओ नीता यादव यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. भाकियूचे प्रदेश सचिव आणि मुंडेरवा ऊस समितीचे अध्यक्ष दिवाणचंद पटेल यांनी सांगितले की, विभागात दुष्काळाची स्थिती आहे. त्यातून ऊस, भात पिक उद्ध्वस्त झाले आहे. अशा स्थितीत कारखान्याकडून ४० कोटी रुपयांची बिले मिळत नाहीत. आंदोलनात भाकियूचे प्रदेश सचिव राम सिंह, मंडल अध्यक्ष सुभाष चंद्र किसान, महासचिव शोभाराम ठाकूर, उपाध्यक्ष मार्तेंदू प्रताप सिंह, राम दुलारे सिंह, राजेन्द्र प्रसाद, रामचंद्र सिंह, ब्रह्मदीन, हृदयराम वर्मा व रामकेवल वर्मा आदी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here