भारत आणि चीनमध्ये आता तणााव वाढतच चालला आहे. लडाख मध्ये एसएसी वर भारतीय आणि चीन सैनिकांमध्ये हिंसक झपड झाली आहे. डी-एक्सलेशन च्या प्रक्रियेदरम्यान लडाख च्या गालवान घाटीमध्ये एक अधिकारी आणि दोन सैनिक चीनसोबत झालेल्या झडपेत शहीद झाले आहेत.
या हल्ल्यात चीनी सैनिकही मारले गेले आहेत. भारतीय सेनेच्या मतानुसार, सोमवारी रात्री हा हल्ला झाला. भारत आणि चीन मध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सीमा वाद सुरु आहे आणि या वादाला चर्चेतून सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही पक्षांकडून सातत्याने चर्चा सुरु होती. या दरम्यान ही घटना समोर आली आहे.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.