भारत आणि युरोपीय महासंघाने जागतिक व्यापार संघटनेच्या सुधारणांवर एकत्रितपणे काम करण्याच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल आणि लोकांसाठी काम करणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी उत्तरदायी असलेल्या युरोपियन आयोगाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि युरोपियन व्यापार आयुक्त वाल्डिस डोम्ब्रोव्स्किस यांनी सर्व मुद्द्यांवर अभिसरण शोधून भारत-युरोपीय महासंघ दरम्यान सुरु असलेल्या मुक्त व्यापार करार विषयक वाटाघाटींना गती देण्याची गरज असल्यावर भर दिला. भारत-युरोपियन महासंघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या पहिल्या मंत्रिस्तरीय बैठकीच्या निमित्ताने उभय नेत्यांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत यावर चर्चा झाली.या बैठकीला दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

दोन्ही बाजूंकडून विवाद निराकरण यंत्रणा, कृषी आणि मत्स्यपालनावरील अनुदान, ई-कॉमर्सला स्थगिती तसेच देशांतर्गत कायद्यांशी संबंधित मुद्द्यांसह जागतिक व्यापार संघटनेतील सुधारणांसाठी समान प्राधान्यक्रमांवर एकत्रितपणे काम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. भारतातील तसेच विकसनशील देशांमधील लाखो लोकांसाठी उपजीविका आणि अन्नसुरक्षेला सहाय्य करणाऱ्या सर्वसहमती-आधारित उपायांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्या समान उद्दिष्टांवर पुढील मार्ग आखण्याची गरज दोन्ही बाजूंकडून व्यक्त करण्यात आली. या संयुक्त प्रयत्नांमुळे आगामी डब्ल्यूटीओ मंत्रीस्तरीय परिषदेत अर्थपूर्ण उपाय शोधण्यात यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली .

या बैठकीनंतर पीयूष गोयल आणि वाल्डिस डोम्ब्रोव्स्किस यांच्या सह-अध्यक्षतेखाली कार्यगट 3 च्या संबंधितांची बैठक झाली. या बैठकीत भारत आणि युरोपीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हितधारकांचा समावेश होता. कार्यगट 3 व्यापार, गुंतवणूक आणि लवचिक पुरवठा साखळी यावर लक्ष केंद्रित करतो.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here