पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताने इतिहास रचला, जपानचा 5-1 ने केला पराभव  

नवी दिल्ली : हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने गतविजेत्या जपानला 5-1 ने पराभूत करून नऊ वर्षांनंतर ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. भारताने शेवटचे सुवर्णपदक 2014 इंचॉनमध्ये जिंकले होते. या विजयासह भारतीय हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकचे थेट तिकीट मिळाले.

चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये 48व्या मिनिटाला अभिषेकने गोल करत टीम इंडियाची आघाडी 4-0 अशी वाढवली. यानंतर 51 व्या मिनिटाला जपानच्या तनाका सेरेनने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह गोल केला. यानंतर टीम इंडियाने आणखी एक गोल करत 5-1 असा विजय मिळवला.

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. भारताला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले, मात्र गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या क्वार्टरच्या 25व्या मिनिटाला भारताने पहिला गोल केला. माजी कर्णधार मनप्रीत सिंगने रिव्हर्स हिटवर गोल करत भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हाफ टाइमपर्यंत भारताने जपानवर 1-0  अशी आघाडी मिळवली होती.

तिसऱ्या क्वार्टरच्या 32व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह उत्कृष्ट गोल केला. यासह भारताची आघाडी 2-0 अशी झाली. यानंतर 36व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह उत्कृष्ट गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी वाढवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here